•   Monday, 29 Apr, 2024

मतदान सुरु होण्याआधीच 4650 कोटी रुपये जप्त

Generic placeholder image
  

देशभरात सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राबवली जात असतानाच, देशातील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील प्रलोभनांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रमाणातील जप्तीच्या दिशेने ईसीआय अर्थात भारतीय निवडणूक आयोगाची  वाटचाल सुरु आहे. आयोगाने पैशाच्या बळाच्या वापराविरूद्ध लढा देण्याच्या  ठाम निर्धाराने आयोगाने,  येत्या शुक्रवारी 18 व्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा सुरु होण्यापूर्वीच आतापर्यंत 4650 कोटी रुपयांपेक्षा जास्त  विक्रमी प्रमाणातील जप्ती केली आहे. वर्ष 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेल्या एकंदर 3475 कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी जप्तीच्या रकमेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आयोगाने विशेष लक्ष केंद्रित करून केलेल्या जप्तीमध्ये 45% अंमली पदार्थ आहेत. सर्वसमावेशक नियोजन, विविध सरकारी संस्थांच्या दरम्यान वाढीव प्रमाणातील सहकार्य आणि एकीकृत प्रतिबंधक कारवाई, नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि तंत्रज्ञानाचा कमाल वापर यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जप्ती शक्य झाली आहे. 

देशाच्या विशिष्ट भागांमध्ये राजकीय निधी याशिवाय  मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा होणारा वापर, यामुळे निवडणुकीची लढत बहुतांश संपन्न राजकीय पक्ष किंवा उमेदवारासाठी  अनुकूलतेकडे झुकल्याने समान संधी राहत नाही. आयोगाकडून केली जाणारी जप्ती म्हणजे विविध प्रलोभने मुक्त  आणि निवडणुकीतील चुकीच्या पद्धतींपासून मुक्त वातावरणात निष्पक्षपातीपणे सुनिश्चित पद्धतीने लोकसभा निवडणूक घेण्याच्या ईसीआयच्या निर्धाराचा महत्त्वाचा भाग आहे.